शेती, माती आणि ग्लॅमर!
काल भारतातील पहिल्या दहा पैकी असलेल्या एका मोठ्या Pharma (औषध निर्माण) कंपनीच्या संचालकांसह एक तास चर्चा झाली. ते आता farming अर्थात शेती क्षेत्रा मध्ये काम सुरू करत आहेत. मातीमध्ये असणारे सेंद्रिय कर्ब १९६५ साली २.५% होते. रासायनिक खतांचा मारा जास्त झाल्याने आज ते प्रमाण ०.५ % पेक्षा खाली आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन तर घटलेच परंतु उत्पादन खर्च आभाळाला भिडला आहे. त्यामुळे कमी खर्चात सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय करता येईल त्यावर संशोधन सुरू आहे. चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. आणि आता त्याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याची योजना बनवली जात आहे.
चर्चेची गाडी अर्थात कोविड परिस्थितीमध्ये काय करावे याकडे वळली. विषाणू प्रतिबंधक उपायांची चर्चा करताना, पिकांची इमुनिटी – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी पिकांना दिली जाणारी खते योग्य असावीत. त्या खतांचे पिकांमध्ये अब्सोरप्शन (खत लागू होणे) चांगले होणे गरजेचे आहे. त्यासाठी पिकांची मुळे मजबूत असणे गरजेचे आहे. अन् त्यासाठी जमिनीत बॅक्टरिया असणे गरजेचे आहे. जर या मूळ प्रश्नाला उत्तर दिले गेले नाही तर शेतकऱ्यांचा सर्व खर्च रासायनिक खते अन् कीटकनाशके यावरच होत राहील अन् शेतकरी या दुष्ट चक्रातून बाहेर पडणार नाही.
माणसाचे देखील असेच आहे. विषाणू अनंत काळापासून अनंत काळापर्यंत आपल्या सभोवती असणार आहेच. आपण आपली प्रतिकार शक्ती वाढवणे, त्यासाठी विषमुक्त आहार घेणे, व्यायाम करणे अन् सकारात्मक राहणे गरजेचे आहे. शेती अन् माती साठी काम करणे आवश्यक आहे!
***
लाखो दिलो की धडकन असलेल्या जुही चा हा नवीन प्लॅन! फार्म हाऊस वर गायी बांधायला शेड बनवणे!
शेतीला ग्लॅमर नाही, असे म्हणणारा वर्ग मोठा आहे. माझ्या मामाच्या घरी पूर्वी एक फलक लावलेला होता. त्यावर लिहिलेले होते – उत्तम शेती, मध्यम व्यापार अन् कनिष्ठ नोकरी! आजही मामाचा मुलगा Gorakshnath Tanpure पंचक्रोशी मध्ये भाजीपाला शेतीसाठी आदर्श पद्धतीने काम करतो आहे
गेले एक वर्षापासून शहरी भागातील परिस्थिती पाहता, नोकरीच्या संधी कमी होत असताना शेतीमध्ये आर्थिक गुंतवणूक करणे अन् शिक्षित तरुणाईला शेतीमध्ये संधी देणे यासाठी . . . . हीच ती वेळ!
शेतीमध्ये गुंतवणूक ना होण्याचे कारण म्हणजे, तिथे असलेला मोठा सरकारी हस्तक्षेप आणि लहरी हवामान!
सरकारी हस्तक्षेपा ची क्षेत्र वगळून (म्हणजे फुकट मिळण्याच्या सबसिडी योजना टाळून) आणि तंत्रज्ञानाचा वापर करून या दोन्ही बाबींवर तोडगा निघू शकतो. अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या भवताली पाहतो.
इस्राईल – पॅलेस्टाईन संघर्षाने त्रस्त असलेल्या इस्राईल मध्ये शांतता, सकारात्मकता आणि शेतीला ग्लॅमर/महत्त्व देताना वृत्तपत्रांनी इतके भान ठेवलेले होते की, तिथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या बातमी पेक्षा तेथील शेतकऱ्यांनी केलेले विक्रमी उत्पादन याला पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली जात होती. जागतिक महामारी च्या काळात अश्याच सकारात्मक पत्रकारितेची गरज आहे
आता जुही ने गायी घेतल्या म्हणजे मला किमान म्हशी घेतल्याचं पाहिजे . . . इतकं तर प्रेम तुम्ही देखील तिच्यावर (जुहीवर) केलं असेलच ना
© डॉ भारत करडक