खुल्या बाजारपेठेत सहभागी व्हावा !

शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जागतिक बाजारपेठेचे दार उघडून देणारी संकल्पना नेवासा तालुका ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड सर्व शेतकरी, कृषी प्रक्रिया उद्योजक, बारा बलुतेदार, कारागीर, गृहउद्योग, महिला उद्योजिका, बचत गट यांच्यासाठी उपलब्ध करून देत आहे. अत्यंत आनंदाची अन् महत्वाची बाब म्हणजे, अन्य सर्व अ-कृषी उत्पादक (कपडे, खेळणी, फर्निचर, शालेय साहित्य, वाहने, इत्यादी इत्यादी) देखील यामध्ये भाग  घेऊ शकतात.

संपूर्ण भारतात उपलब्ध असणाऱ्या ऑनलाईन विक्री पोर्टल चे एकाच ठिकाणी नोंदणी करणारे दालन उपलब्ध केले आहे. त्यासाठी सर्व शेतकरी, उद्योजकांनी, व्यावसायिकांनी, पुढील लिंक वर क्लिक करून तिथे दिलेली माहिती भरावी.  (आवश्यक माहिती: नाव, पत्ता, आधार, पॅन कार्ड, बँक अकाउंट माहिती, इत्यादी )

लिंक : https://bit.ly/newasataluka  

  • वरील लिंक मध्ये आपला मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी लिहावा. आपणास एक ओटीपी येईल. तो इथे टाकून व्हेरिफाय केला कि आपली माहिती विचारली जाईल.
  • वरील लिंक वर सर्व माहिती भरल्यानंतर, तुमच्या व्यवसाय/फर्म चे नावाचे एक स्टोअर तयार होईल. त्यामध्ये तुम्ही तुमच्या एकापेक्षा जास्त कितीही उत्पादनांची माहिती भरून ग्राहकांना आकर्षित करू शकता. त्यासाठी उत्पादनांचे चांगले फोटो, उत्पादनाची पॅकिंग ची माहिती (लांबी, उंची, रुंदी आणि वजन) अचूक भरणे गरजेचे आहे.
  • आपण ठरवलेली किंमत अन् दिलेली सवलत / डिस्काउंट तेथे दाखवला जाईल.
  • आपल्या स्टोअर चे युजर नेम अन् पासवर्ड कुणालाही देवू नये. स्टोअर च्याच लिंक / डॅशबोर्ड वरून आपण आपल्याला आलेल्या ऑर्डर्स पाहू शकाल. त्यानुसार आपले साहित्य / उत्पादन पॅक करून ठेवायचे आहे. कुरिअर चे प्रतिनिधी येवून ते घेवून जातील आणि ग्राहकांना पोहच करतील. याच डॅशबोर्ड वर आपल्याला मिळणाऱ्या रकमेचा हिशोब पाहायला मिळेल.
  • एकदा ऑनलाईन स्टोअर तयार झाले की, आपल्या इच्छित ग्राहकांना फक्त त्याची एक लिंक पाठवावी. त्या लिंक वरून पैसे भरून ग्राहक खरेदी करू शकतील.
  • उत्पादनांच्या वाहतुकीसाठी ग्राहकांना आवश्यक असणारी सर्व प्रकारची कुरिअर वाहतूक सेवा देखील योग्य दरात तिथेच उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला वेगळी व्यवस्था करण्याची गरज नाही. ग्राहकांनी निवडलेल्या कुरियर सेवेचे लोक तुमच्या पत्त्यावर येऊन योग्य पद्धतीने पॅक केलेले साहित्य / उत्पादन घेऊन जातील. त्याचे पैसे तुमच्या बँक अकाउंट वर जमा झालेले असतील. बँकेच्या नियमाप्रमाणे ठराविक दिवशी ते तुमच्या खात्यात वर्ग होतील.
  • आपल्याला काही अडचण असल्यास, नेता कंपनी कार्यालयातील व्यक्ती आपणास मदत करतील. अथवा, अश्या प्रकारे ऑनलाईन स्टोअर करून देणारे युवक रुपये ५००/- फक्त इतकी एकरकमी फी घेवून आपले स्टोअर तयार करून देवू शकतील. या उपक्रमातून विक्री कशी करायची याचे संपूर्ण प्रशिक्षण देतील.

****

संपूर्ण देशभर विक्री व्यवस्था !

नेता कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन स्टोअर तयार केल्यावर, खालील मोठ्या ऑनलाईन पोर्टल वर आपले उत्पादन विक्रीसाठी दिसू शकेल. त्याची जाहिरात देशाच्या विविध भागात सातत्याने सुरू आहे.

१) Paytm मार्ट App : https://paytmmall.com/

२) MagicPin : https://magicpin.in/

३) Nstore : https://nstore.in/ondc/

४) Mystore : https://www.mystore.in/en/

५) Zionmart : https://zionmart.in/

आणि  https://ondc.org/sellers/ वर अन्य अनेक!

उदा. Feelgud Jaggery  या उत्पादनाचे नाव टाकून ते किती ऑनलाईन पोर्टल वर विक्रीस उपलब्ध आहे, याची खात्री करू शकता.

*****

(ही माहिती तुम्ही तुमच्या परिचित मित्रांना पाठवून त्यांना देखील ही संधी उपलब्ध करून देऊ शकता.)

अधिक माहिती आणि अडचण असल्यास संपर्क :

व्हॉट्सॲप : 9860778689

ईमेल: newasa.agro@gmail.com