बेरोजगारीचे भयानक वास्तव
देशातील बेरोजगारीचा बराच गाजावाजा सध्या माध्यमांतुन केला जातोय. जुनी व्रुत्तपत्रे चाळली तर भारतात अगदी १९७० पासुन पेपर च्या पहिल्या पानावर बेरोजगारी, भ्रष्टाचार अन राजकीय कुरघोड्या वाचायला मिळतात! बेरोजगारीचे दोन प्रकार करता येतील. पात्रता असुनही नोकरीची संधी मिळत नाही असा एक वर्ग अन लायकी नसताना पण औपचारिक पदवी असल्यामुळे नोकरीची अपेक्षा बाळगणारा दुसरा वर्ग! पहिला वर्ग नोकरीची संधी मिळाली नाही तर स्वयंरोजगाराकडे वळतो अन नोकरी देणारा बनतो. दुसरा वर्ग मोर्चे काढतो अन लायकी झाकण्याचा प्रयत्न करतो.
मी २०११ पासुन प्राचार्य अन समकक्ष पदावर पुणे, अहमदनगर अन शेवगांव अश्या शहरी अन ग्रामीण भागात काम केलेले आहे. शेकडोच नव्हे तर हजारो तरुणांच्या नोकरीसाठी मुलाखती घेतलेल्या आहेत. खेदाने नमुद करावे लागते कि नोकरीची अपेक्षा सर्वांनाच होती परंतु पात्रता मात्र अभावानेच आढळली. वारेमाप शिक्षण संस्था निर्माण झाल्याने दर्जा घसरुन Below Average पदवीधर अन उच्च(!) शिक्षित निर्माण झाले.
नगर शहरात एका शाळेसाठी २०१२ ला तीन दिवस बसुन २०४ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या तर एकही माई का लाल नोकरी द्यायच्या लायकिचा निघाला नाही. शेवटी संस्थाचालकांना शाळा चालवायला काही लोक घेणे गरजेचे होते म्हणुन बरे वाटलेले ६ लोकांची शिफारस केली! २०१६ ला एक Biochemistry मधील Ph.D. धारकाने रु. १२,०००/- प्रतिमहिना पगारावर काम करायची तयारी दर्शविली. त्याला साष्टांग दंडवत घालुन रवाना केले.
नोकरीला असलेले ग्लैमर हेच बेरोजगारीचे मुळ आहे. अन सरकारी नोकरीचे तर विचारुच नका! C.A. झालेला एक तरुन नागपुर पोलिसांत भरती झालेला आढळला तर पोलीस महानिरिक्षकांनी त्याला भेटुन कारण विचारले. घरच्यांना सरकारीच नोकरी पाहिजे असा दबाव असल्याने भरती झालो असे ऊत्तर त्याने दिले.
शिक्षण घेत असताना व्यावहारीक अन व्यावसायिक शिक्षण न दिल्याने आजचे चित्र दिसते आहे. शिक्षण संस्था चालकांच्या पोराबाळांची सोय करणे अन ईतरांना कारकुन बनवणे या एकाच हेतुने शिक्षण व्यवस्था चालवली जात आहे.
शेतीप्रधान देशात शिक्षणात शेतीला स्थान नाही. शेतीच्या अर्थशास्राला स्थान नाही. प्रक्रिया अन विपनन प्रक्रियेला स्थान नाही. मग शेतीवर आधारित ८०% लोकसंखेला शेती कशी समजणार. शेतीतील समस्या कश्या सुटणार! नोकरी अन रोजगार कसे मिळणार.
देशात ईतके प्रश्न आहेत कि एका एका प्रश्नावर काम करायला सुरुवात केली तर नोकरी करायला वेळ अन माणसे मिळणार नाहीत. जगात क्रमांक ऐक चा दुध निर्मिती करणार देश म्हणुन मिरवणारे आपण प्रती जनावर दुध उत्पादक क्षमतेमधे मागे आहोत. दुधाची भेसळ आपण औळखु अन रोखु शकलेलो नाहीत. रोज विष पितोय अन पाजतोय !
शेतीतील सिंचन समस्या आहे. प्रुथ्वीवर ७१ % पाणी असुनही, सगळे समुद्र भरलेले असुनही समुद्रापासुन ५०० किमी अंतरावरील मराठवाडा, विदर्भ, तेलंगाना सतत दुष्काळाने का होरपळतात यावत कुणी उत्तर शोधलेय का?
छोट्या मेडिकल उपकरणांपासुन बोफोर्स अन राफेल सारख्या ऊच्च दर्जाच्या संरक्षण सामग्रीवर आपण संशोधन का केले नाही? आपण जर काम केले तर आपण ईस्रो ला जागतीक स्तरावर मानबिंदु बनवु शकतो हे दाखवुन दिलेले आहे. सर्वच मुलभुत क्षेत्रात ईस्रो निर्माण करण्याची वेळ आलेली आहे.
प्रश्र जितका मोठा असतो तितके त्याचे उत्तर साधारण असते असे माझे मत आहे. नोकरीसाठी शिक्षण हा गैरसमज दुर केला तर बेरोजगारीचे थवे सकारात्मक कामांकडे वळवता येतील अन त्या ऊर्जेचा देशाला अन समाजाला ऊपयोग करुन घेता येईल.
डाॅ. भारत गंगाधर करडक