खाजगी बाजार समिती
शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तीनशे पन्नास तालुक्यामध्ये “खाजगी बाजार समिती” उभारण्यासाठी 700 कोटी रुपयांची गुंतवणूक उभारण्याची आवश्यकता आहे. एका खाजगी बाजार समितीसाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे पाच एकर जमीन आणि दोन कोटी रुपयांचे इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे. सहकार अन् पणन खाते अश्या प्रकारे खाजगी बाजार समितीला मान्यता देते.
शेतकरी उत्पादक कंपनीकडे पाच एकर जागा उपलब्ध होणे, ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. परंतु शेतकरी उत्पादक कंपनीला दोन कोटी रुपयांचा निधी / कर्ज कुठल्याही बँकेकडून किंवा आर्थिक संस्थेकडून मिळणे अशक्य आहे.
खाजगी बाजार समितीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात सर्वच पिकांच्या विक्री ची व्यवस्था उभी राहू शकेल. शेतकऱ्यांना न्याय दिला जाऊ शकेल. शासकीय निधी किंवा खाजगी गुंतवणूकदारांनी या विषयाकडे लक्ष दिल्यास महाराष्ट्रातील शेतमालाला योग्य बाजार मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांना उत्तम सेवा दिली जाण्यासाठी मोठे काम उभे राहू शकेल.
महाराष्ट्रातील उपलब्ध शेतीमालावर प्रक्रिया आणि त्यातून प्रचंड प्रमाणावर रोजगार निर्मिती करू शकणारा हा प्रकल्प असेल. दोन कोटीची गुंतवणूक त्या तालुक्यात किमान 200 लोकांना रोजगार देऊ शकेल.
तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये दोन कोटीचे गुंतवणुकीतून फक्त दोनच रोजगार उपलब्ध होतात. हे पाहता अशा प्रकारची गुंतवणूक शेती क्षेत्रात येणे ही केवळ शेती क्षेत्राची गरज नाही तर त्याहीपेक्षा देशातील बेरोजगारीला सक्षम उत्तर देण्याचा पर्याय आहे.
डॉ भारत करडक